Rachlya Rushi Munini

रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत
(रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत)
(डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत)

वरदायका गणेशा, महदाशया सुरेशा
वरदायका गणेशा, महदाशया सुरेशा
का वेध लाविसी तु हेरंब, एकदंत?
(रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत)
(डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत)

येसी जळातुनी तु कोणा कळे न हेतू
येसी जळातुनी तु कोणा कळे न हेतू
अजुनी भ्रमात का रे योगी, मुनी-महंत?
(रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत)
(डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत)

मढ मंदिरात येती जे-जे अनन्य भक्त
मढ मंदिरात येती जे-जे अनन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत
(रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत)
(डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत)



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link