Tu Sukhakarta

तू सुखकर्ता, तू दुखहर्ता
कृपा लाभू दे तुझी आम्हा, देवा
हे लंबोदरा, हे मयुरेश्वरा
तुझ्या दर्शने विघ्न हरू, देवा

तू सुखकर्ता, तू दुखहर्ता
कृपा लाभू दे तुझी आम्हा, देवा
हे लंबोदरा, हे मयुरेश्वरा
तुझ्या दर्शने विघ्न हरू, देवा

स्मरता तुला होई आनंद रे
तू बुद्धिदाता विघ्नेश रे
दृष्टीस पडता मूर्ती तुझी
विरतो दिशातून अंधार रे

हो, स्मरता तुला होई आनंद रे
तू बुद्धिदाता विघ्नेश रे
दृष्टीस पडता मूर्ती तुझी
विरतो दिशातून अंधार रे

तेजाळते पूर्ण ब्रह्मांड हे, देवा

तू सुखकर्ता, तू दुखहर्ता
कृपा लाभू दे तुझी आम्हा, देवा
हे लंबोदरा, हे मयुरेश्वरा
तुझ्या दर्शने विघ्न हरू, देवा

प्रथमेश तू, ज्ञानदायक तू
कला-गुणांचा नायक तू
तू पाठीराखा, सखा तूच रे
दुःखास, चिंतेस हरिसी तू

प्रथमेश तू, ज्ञानदायक तू
कला-गुणांचा नायक तू
तू पाठीराखा, सखा तूच रे
दुःखास, चिंतेस हरिसी तू

मूल आधार, साकार, ओंकार तू, देवा

तू सुखकर्ता, तू दुखहर्ता
कृपा लाभू दे तुझी आम्हा, देवा
हे लंबोदरा, हे मयुरेश्वरा
तुझ्या दर्शने विघ्न हरू, देवा

तू सुखकर्ता, तू दुखहर्ता
कृपा लाभू दे तुझी आम्हा, देवा
हे लंबोदरा, हे मयुरेश्वरा
तुझ्या दर्शने विघ्न हरू, देवा



Credits
Writer(s): Traditional, Kedar Pandit
Lyrics powered by www.musixmatch.com

Link