Ishakacha Baan

नार देखणी, केस सोडूनी पाठीवर मोकळे
नकळत ये कुठूनती धुंद मोगरा आसमंती दरवळे
वळून पाहते, हसून लाजते, हृदयी आज होई का खुळे?

नारी गं, नारी गं, नारी गं, जी रं जी
नारी गं, नारी गं, नारी गं, जी रं जी जी

हा, गुलजार मदन मंजिरी, सूरत साजिरी मोराचा डौल
दातात दाबूनी ओठ, नजर ही थेट फेकते जाळ
रती जणू मदनाची उभी, जशी वीज उमटावी नभी
मनातल्या आईन्यातील छबी, लक-लक मी चांदणी

आली नखर ही नार, करून शिणगार
ज्वानीच्या तोऱ्यात, मस्तीच्या झोकात
काळीज बेझार, नजरेची कट्यार ही

इश्काचा बाण सुटला, बाई
काळजात खोल-खोल रुतला
इश्काचा बाण सुटला, बाई
काळजात खोल-खोल रुतला

हा, तोल कसा गं सावरू? किती मी आवरू भरल्या ज्वानीला?
नाजुक कमरेवरी गं छुम-छुम करी चांदीचा छल्ला
हा, छेडू नका ना, पावन नजर राखून आडवाटेला
धरू नका ना, हातात हा हात दाबून, उमर माझी १६

हो, गोऱ्या-गोऱ्या खांद्यावरचा तीळ जीवाला छळतो गं
धडधड आरं काळीज पाहून एकच ठोका चुकतो गं
(गोऱ्या-गोऱ्या खांद्यावरचा तीळ जीवाला छळतो गं)
(धडधड आरं काळीज पाहून एकच ठोका चुकतो गं)

ढगान रूपानं आलंया तुफान
वाऱ्याच्या वेगानं इश्काच्या उधाण
अंगात वेधून घालती पैमान ही

इश्काचा बाण सुटला, बाई
काळजात खोल-खोल रुतला
इश्काचा बाण सुटला, बाई
काळजात खोल-खोल रुतला

हे, गुलजार मदन मंजिरी, सूरत साजिरी मोराचा डौल
दातात दाबूनी ओठ, नजर ही थेट फेकते जाळ
रती जणू मदनाची उभी, जशी वीज उमटावी नभी
मनातल्या आईन्यातील छबी, लक-लक ही चांदणी

इश्काचा बाण सुटला, बाई
काळजात खोल-खोल रुतला (आता गं बया!)
इश्काचा बाण सुटला, बाई
काळजात खोल-खोल रुतला (काय झाल?)

इश्काचा बाण सुटला, बाई-बाई
काळजात खोल-खोल रुतला
इश्काचा बाण सुटला, बाई-बाई
काळजात खोल-खोल रुतला (धसला का बाण?)



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Praful Karlekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link