Kay Sangu Jhali Dhavpal

काय सांगू झाली धावपळ
लोटालोटीत जीव लय गळ
कुणी चढाया दावी बळ
ए, कुणी उतराया तात्काळ

मग डब्याला इंजन जुळं
गाडी झुकझुक, झुकझुक पळं
मग डब्याला इंजन जुळं
गाडी झुकझुक, झुकझुक पळं

गर्दी ही भारी, डब्याच्या दारी
पुढं ना घुसायला वाट
Hey, गर्दी ही भारी, डब्याच्या दारी
पुढं ना घुसायला वाट

धक्काबुक्कीनं गेलो खिडकीनं
राहिलो आत मी ताठ

त्यात घाम हा थेंब-थेंब गळं
त्यात घाम हा थेंब-थेंब गळं
गाडी झुकझुक, झुकझुक पळं
त्यात घाम हा थेंब-थेंब गळं
गाडी झुकझुक, झुकझुक पळं

एकीला बसला, तिनं तो सोसला
धक्का हा माझा भारी
एकीला बसला, तिनं तो सोसला
धक्का हा माझा भारी

गाडीत हटकून, उभी ती चिटकून
वरून म्हणते, "sorry"

मग मिळाला की signal
गाडी झुकझुक, झुकझुक पळं
मग मिळाला की signal
गाडी झुकझुक, झुकझुक पळं

आधीच गडबड, त्यात ही परवळ
गाडीत सारा गोंधळ
ए, आधीच गडबड, त्यात ही परवळ
गाडीत सारा गोंधळ

ए, तरण्या पोरी, चोर चोरी
मुद्दाम काढी कळ

हे पाहुनी मन कळवळ
गाडी झुकझुक, झुकझुक पळं
हे पाहुनी मन कळवळ
गाडी झुकझुक, झुकझुक पळं

गाडी झुकझुक, झुकझुक पळं
गाडी झुकझुक, झुकझुक पळं



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Ganesh D Salavi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link