Hallicha Jamana Nakli

सौभाग्याच कुंकू पुसुनी बाई लावते टिकली
सौभाग्याच कुंकू पुसुनी बाई लावते टिकली
हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली
हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली

नवरा घरात घरकाम करी, बायको लोळते पलंगावरी
नवरा घरात घरकाम करी, बायको लोळते पलंगावरी
घरकाम करून, पाणी भरून कंबर याची वाकली
घरकाम करून, पाणी भरून कंबर याची वाकली

हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली
हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली

गेली नववारी, गेली साडी
आलं blazer, blouse, body
हे, गेली नववारी, गेली साडी
आलं blazer, blouse, body

ओठाला लाली, powder गाली
अत्तर माराया शिकली
ओठाला लाली, powder गाली
अत्तर माराया शिकली

हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली
हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली

इथं खऱ्याचं होतंय खोट, लबाडाचं तोंड लय मोठं
इथं खऱ्याचं होतंय खोट, लबाडाचं तोंड लय मोठं
माणुसकीला सोडून दुनिया पैशापुढंच झुकली
माणुसकीला सोडून दुनिया पैशापुढंच झुकली

हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली
हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली

ज्याच्या हातात असते सत्ता, त्याला भरपूर मिळतो भत्ता
ए, ज्याच्या हातात असते सत्ता, त्याला भरपूर मिळतो भत्ता
घोटाळे करती, तिजोऱ्या भरती सुखाला जनता मुकली
घोटाळे करती, तिजोऱ्या भरती सुखाला जनता मुकली

हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली
हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली

सौभाग्याच कुंकू पुसुनी बाई लावते टिकली
सौभाग्याच कुंकू पुसुनी बाई लावते टिकली
हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली
हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली

हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली
हल्लीचा जमाना नकली रं दादा, नकली



Credits
Writer(s): Harshad Shinde, Haridas Kad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link