Roj Roj Navyane (From "Deva Ek Atrangee (Original Motion Picture Soundtrack)")

अधीर होईल मन पुन्हा सुखाने (सुखाने)
वाट पाहिल ती ही आनंदाने
अधीर होईल मन पुन्हा सुखाने
वाट पाहिल ते ही आनंदाने

तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने

सोनेरी किरणे डोळ्यात लेऊन
कोवळे से ऊन होऊन ये जरा
बिल्लोरी चांदण्या कानात माळून
भरले आभाळ होऊन

कधी-कधी बरसून ये, कधी-कधी हमसून ये
कधी-कधी दाटून ये ना जरा
कधी-कधी सांगून ये, कधी-कधी ना सांगता
कधी-कधी फसवून ये ना जगाला साऱ्या

क्षण साद ही देतील रे मुक्याने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने

श्वासात भरून आण कधी फुले
होऊन ये तुच कधी तिन्ही ऋतू
बोटानी दूर कर बटा या लाजेच्या
गालावरी रान दंवाचे

कधी-कधी वेचून ये, कधी-कधी न्हाऊन ये
कधी-कधी बिलगून ये ना जरा
कधी-कधी हरवून ये, कधी-कधी शोधून ये
कधी-कधी चुकवून ये ना जगाला साऱ्या

मग प्रीत ही बहरेल रे विरहाने
तू भेट ना रे रोज-रोज नव्याने
मग प्रीत ही बहरेल रे विरहाने
तू भेट ना रे..., नव्याने



Credits
Writer(s): Kshitij Patwardhan, Amitraj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link