Yei Oh Vitthale - Vitthalachi Aarti

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
निढळावरी कर...
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे
ठेवुनी वाट मी पाहे

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये

आलिया, गेलीया हाती धाडी निरोप
आलिया, गेलीया हाती धाडी निरोप
पंढरपुरी आहे...
पंढरपुरी आहे माझा मायबाप
हो माझा मायबाप

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये

पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला
पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला
गरुडावर बैसुनी...
गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला
हो माझा कैवारी आला

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये

विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी
विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा...
विष्णुदास नामा जीवे-भावे ओवाळी
हो जीवे-भावे ओवाळी

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये



Credits
Writer(s): Rajshri
Lyrics powered by www.musixmatch.com

Link