Chal Ga Sakhe Chal Ga Sakhe Pandhari Baghaya

ए, चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया
चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया
उशीर नको करू, वाट लाग तू चालाया
ए, चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया
चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया

माझे-माझे करसी किती, सोड आता माया
तिथे तुला दिसले गं माझा विठुराया
शिरावरी ठेवील तो कृपेची गं छाया
शिरावरी ठेवील तो कृपेची गं छाया

चंद्रभागे तटी विठ्ठलाचे गुण गाया
चंद्रभागे तटी विठ्ठलाचे गुण गाया
ए, चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया
चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया

पंढरीची यात्रा उद्यावर आली
आवर आता लवकर गं, पालखी निघाली
सकाळची गाडी ती निघूनिया गेली
सकाळची गाडी ती निघूनिया गेली

वेळ ही मोलाची आहे जाईल गं वाया
वेळ ही मोलाची आहे जाईल गं वाया
चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया
चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया

आषाढी कार्तिकी एकादशीला
भक्तजन येति देव दर्शनाला
रंग तिथे येत असे कथा-कीर्तनाला
रंग तिथे येत असे कथा-कीर्तनाला

नाम घेता देवाजीचे शुद्ध होते काया
नाम घेता देवाजीचे शुद्ध होते काया
चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया
चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया

किती-किती सांगू मी देवाची महती
भवताप दुःख सारे हरूनिया जाती
वारकरी, माळकरी गुणगान गाती
वारकरी, माळकरी गुणगान गाती

हरी नामाचा गं तिथे आनंद लुटाया
हरी नामाचा गं तिथे आनंद लुटाया
चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया
चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया

उशीर नको करू, वाट लाग तू चालाया
चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया
चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया
चल गं सखे, चल गं सखे, पंढरी बघाया



Credits
Writer(s): Vitthal Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link