Ashi Kashi

गारगार कोडशात फुटावी ही आग तशी
फुटली गं, जरा-जरा पेटली गं
काजळाच्या बहाण्याणे डोळ्यात भरुनी
तुला जगते मी, हो, रोज तुला बघते मी

बघुन रोज मी तुला हा जीव जाळतो
स्वप्न सारी गोफणीला टांगतो
चांदणी गं पापणीला बांधतो
अशी-कशी

गारगार कोडशात फुटावी ही आग तशी
फुटली गं, जरा-जरा पेटली गं

बघत-बघत तुला विणत जाई रे मन
भास तू, हृदयात तू
जगत-जगत, तुझी सोबत मागत
माझा श्वास तू, अरिजात तू

वाहते हवा का आज केशरी?
दाही दिशात घुमू लागली गं आज
मधूर-मधुर, सुमधुर बासरी

वाळूच्या कणात जशी पावलांची खून
तशी छबी तुझी मनात या उमटली गं
गारगार कोडशात उठावी ही आग कशी
उठली रे, जरा-जरा पेटली रे

बघुन रोज मी तुला हा जीव जाळतो
स्वप्न सारी गोफणीला टांगतो
चांदणी गं पापणीला बांधतो

दुमड-दुमडतो मी लिहुन कविता
तुला वाचतो, मला वेच तू
उडते-फिरते तुझ्या अवती-भवती
तुला शोधते, मला खेच तू

सारे दुवे घे आज जोडले
स्वप्नाचे तू नवे सूर आज
मदिर, मधूर-मधूर, सुमधुर छेडले

गुलमोहराची जणू कोवळ्या उन्हात
उभी सावली ही फुलताना दिसली रे
गारगार कोडशात फुटावी ही आग तशी
फुटली गं, जरा-जरा पेटली गं

बघुन रोज मी तुला हा जीव जाळतो
स्वप्न सारी गोफणीला टांगतो
चांदणी गं पापणीला बांधतो
अशी-कशी



Credits
Writer(s): Jai Atre, Ashwin Srinivasan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link