Adgula Madgula

रंगाविना रंगली, साथ तुझी चांगली
पुरून उरल, उरून पुरल येड्या जीवाला
वाट जरी तोकडी, चाल नको वाकडी
सटर-फटर नको ती फिकर आज मनाला

अडगुल-मडगुल सोन्याच कडगुल
माझ-तुझ नात जणू देवान घडवील
अडगुल-मडगुल सोन्याच कडगुल
माझ-तुझ नात जणू देवान घडवील

घाई-घाई आवरून लाडी-गोडी (लाडी-गोडी)
साठवून तु उदयाला ठेव थोडी
नवीन किस्सा, नवीन बाता
खुशाल ऊन पावसाच्या मारू आज गप्पा

कमाल सारी की म्हणावी जादू न्यारी
जीवाची काळजी पळून जाते पाठमोरी
मजेत घ्यावी नवी भरारी
जगावी ज़िन्दगी तुझ्यासाठी बेत पक्का

रंगाविना रंगली, साथ तुझी चांगली
पुरून उरल, उरून पुरल येड्या जीवाला
वाट जरी तोकडी, चाल नको वाकडी
सटर-फटर नको ती फिकर आज मनाला

अडगुल-मडगुल सोन्याच कडगुल
माझ-तुझ नात जणू देवान घडवील
अडगुल-मडगुल सोन्याच कडगुल
माझ-तुझ नात जणू देवान घडवील

आस-पास भास होतो ऐन वेळी (ऐन वेळी)
तु असावी की मनाची मस्त खेळी
जराशी कट्टी, जराशी बट्टी
क्षणात लोट-पोट गुदगुल्यानी भरते झोळी

उनाड सारे वाटेना कोणाची भीती (कोणाची भीती)
सुखाचे धागे-दोरे हे विणावे किती?
मनास धुंधी, दिशा सुगंधी
अशात भासते आभाळ आले आज खाली

रंगाविना रंगली, साथ तुझी चांगली
पुरून उरल, उरून पुरल येड्या जीवाला
वाट जरी तोकडी, चाल नको वाकडी
सटर-फटर नको ती फिकर आज मनाला

अडगुल-मडगुल सोन्याच कडगुल
माझ-तुझ नात जणू देवान घडवील
अडगुल-मडगुल सोन्याच कडगुल
माझ-तुझ नात जणू देवान घडवील



Credits
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Rohan Rohan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link