Na Kalata

न कळता आज वाटेवरी वळले नि तो भेटला
परीकथा हीच वाटे खरी कळले न काही मला
पावलो-पावली हो जशी सावली
तो तसा सोबती चालला

सोबती चालता, मी उगी बोलता
भाबडा हात हाती दिला
न कळता आज वाटेवरी वळले नि तो भेटला

पारखा तो जरी आपलासा मला भासला
संपला मनमनी आज दोघातला फासला

जाहले मी जरी कावरी-बावरी
चालले सोबतीने पुन्हा

सोबती चालता, मी उगी बोलता
भाबडा हात हाती दिला
न कळता आज वाटेवरी वळले नि तो भेटला

बोलला तो जरी सूर माझ्या मनी जागला
हासला तो जरी छंद माझ्या मनी लागला

पाहता-पाहता काय झाले मला?
श्वास ही आज वेडावला

सोबती चालता, मी उगी बोलता
भाबडा हात हाती दिला
न कळता आज वाटेवरी वळले नि तो भेटला



Credits
Writer(s): Samir Saptiskar, Abhishek Khankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link