Kevadyacha Paan Tu

केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू

सागराची गाज तू, गालावर लाज तू
आतुरल्या डोळ्याचं सपान तू

केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं रं भान तू

तू रे गाभुळला मेघ, तुझ्या पिरतीची धग
सुख ओंजळीत आज माइ ना
सुख ओंजळीत आज माइ ना

हो, तूझा मातला मोहर, तुझ्या मिठीत पाझर
येड्या काळजाचा तोल ऱ्हाइ ना
येड्या काळजाचा तोल ऱ्हाइ ना

मेघुटाची हूल तू, चांदव्याची भूल तू
भागं ना कधी अशी तहान तू

केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं रं भान तू

प स नी सा रे ग रे सा नी सा
प स नी सा ग सा ग म ग प रे
रे म प ध म ग म ग म ग म
ग म ग रे ग म रे सा रे सा

तुझ्या डोळ्यांची कमान, तिथं ववाळीन प्राण
व्हईन फुफाट्यात तुझी सावली
व्हईन फुफाट्यात तुझी सावली

तुझ्या जोडीनं-गोडीनं, हरपुनी देहभान
आणू लक्षुमीला सोनपावली
आणू लक्षुमीला सोनपावली

जगण्याची रित तू, खोप्यातली प्रीत तू
कवाच्या रं पुण्याईचं दान तू?

केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं रं भान तू



Credits
Writer(s): Guru Thakur, Vijay Narayan Gavande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link