Sarakha Aabhas

सारखा आभास होतो सांजवेळेला तुझा
हे दिवे, हे काजवे करती तुझ्या खाणाखुणा
मन बोले हे, नाही एकटा मी
तन सांगे, तू माझ्या रोमरोमी
भासे मला, तू बोलशी मज सजण सावरिया

हाय हाय, पसरुनी बाहू कधीचा मी उभा येथे
जा मला घेऊन जा तू पाहिजे तेथे
सारखा आभास होतो सांजवेळेला तुझा

ही तुझी चाहूल की ही झुळूक वाऱ्याची
बोलते आहेस तू भाषाच मौनाची
मिटुनी घेतो पापण्या अन् पाहतो काही
माझिया डोळ्यापुढे चेहरा तुझा येई
पाहिले रुपात त्या नवरंग प्रेमाचे

हाय हाय, पसरुनी बाहू कधीचा मी उभा येथे
जा मला घेऊन जा तू पाहिजे तेथे
सारखा आभास होतो सांजवेळेला तुझा

टाकला जो तू उसासा श्वास तो माझा
ही अशी आहे तुझी माझ्याकडे ये-जा
मज इथे बेहोष करुनी गंध जो वाहे
मी समजलो कि तुझी ही ओढणी आहे
खोवले मी फूल त्यावर अधीर हृदयाचे

हाय हाय, पसरुनी बाहू कधीचा मी उभा येथे
जा मला घेऊन जा तू पाहिजे तेथे
सारखा आभास होतो सांजवेळेला तुझा
हे दिवे, हे काजवे करती तुझ्या खाणाखुणा
मन बोले हे, नाही एकटा मी
तन सांगे, तू माझ्या रोमरोमी
भासे मला तू बोलशी मज सजण सावरिया

हाय हाय, पसरुनी बाहू कधीचा मी उभा येथे
जा मला घेऊन जा तू पाहिजे तेथे
सारखा आभास होतो सांजवेळेला तुझा



Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale, Chandrashekhar Achut Sanekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link