Man Labad He

पहिले-पहिले हे शहारे
मन मोहरले हे, पिया रे
पहिल्या-पहिल्या चाहुलीने
पुरती फसले हे, पिया रे

मन बावरे भांबावले
धडधडले, उधळत सुटले
का थांबले नकळत असे?
मन तुझेच गुज हे जीवापाड जपते

मन लबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल ही प्रीत, पिया?

मन लबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल ही प्रीत, पिया?

हसरे नवे स्वप्न मी हे पाहते
तुला माझ्यात मी रे पाहते
तुझे भास असे रेंगाळती आस-पास, पिया
जिथे-तिथे शोधते तुला माझ्यात हरवुनिया

तुझ्या एका इशाऱ्याची मनी आस रे

मन लबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल ही प्रीत, पिया?

मन लबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल ही प्रीत, पिया?

कसली जादू तुझी ही भुलवते
तुझ्या साथीला बहाणे शोधते
तू हासलास तर मी हासते उगाच रे
तू पाहिलेस तर मी ही लाजते हळूच रे

तुला ऐकताच मी विसरून जाते मलाच रे
तुझा अलगत होता स्पर्श मनी का थरथररे?
तुझ्या घट्ट त्या मिठीला जीव आतुर रे

मन लबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल ही प्रीत, पिया?

मन लबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल ही प्रीत, पिया?



Credits
Writer(s): Kashi Richard, Vikrant Rashmi Hirnaik
Lyrics powered by www.musixmatch.com

Link