Tula Pahato Me

तुला पाहतो मी मला पाहताना
कधी माझिया तू समोरीस ये ना

रेंगाळशी का वळणावरी तू
जातेस नंतर केव्हा घरी तू
होऊन मग कावरीबावरी तू
मनाचे सहेलीस समजावताना

असतो कधी एकटा मीच जेव्हा
जातेस माझ्या जवळून तेव्हा
सहवास थोडा थोडा दुरावा
लपेटून घेतेस पळभर सुखांना

चोरून बघणे खाणाखुणा ही
कळते तुलाही कळते मलाही
आता दिशा एक माझी तुझीही
आता सोड तू लाजरा हा बहाणा



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link