Aaj Wajat Gajat

आज वाजत-गाजत गणराया घरा आले
आज वाजत-गाजत गणराया घरा आले

देव पाहून वर्षानं, आज घरोघरी आला
बाप्पा मोरया गजर सारे मिळून हो बोला
आज गणेश घरी आला, बाळ गोपाळ नाचले
आज वाजत गाजत गणराया घरा आले

नवरंगांची रांगोळी छान रेखुया दारात
नवरंगांची रांगोळी छान रेखुया दारात
गणरायाला पुजूया आज सोनेरी मखरात
सात रंगात आंगण घराघरांचे सजले
आज वाजत-गाजत गणराया घरा आले

लावू मंगल तोरण घराघरांच्या दारात
रंगीबेरंगी दिपांची, करू फुलांची आरास
भावभक्तीने भक्तांचे मन भिजूनीया गेले
आज वाजत-गाजत गणराया घरा आले

स्वागताला हो देवाच्या मनमोकळे गाऊया
स्वागताला हो देवाच्या मनमोकळे गाऊया
रंग गुलाल उधळून तालासुरात न्हाऊया
ढोल, लेझीम तालात सारा आसमंत डोले
आज वाजत-गाजत गणराया घरा आले

सर्व मंगलाची मूर्ती, साऱ्या कामानांची पूर्ती
सर्व मंगलाची मूर्ती, साऱ्या कामानांची पूर्ती
देवाचिया देवा हो, देवाचिया देवा हो
गणराया गणपती, गणराया गणपती
रूप देखणे दिसावे, आम्हा दर्शनासी द्यावे
रूप देखणे दिसावे, आम्हा दर्शनासी द्यावे
आज वाजत-गाजत गणराया घरा आले
आज वाजत-गाजत गणराया घरा आले



Credits
Writer(s): Jayant Bhede, Keshav Badge, Vilas Aadkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link