Prarabdhachi Veen (Poem Recital)

प्रारब्धाची वीण कुणाची घट्ट कुणाची सैल
कुणी पाणवठ्याच्या पाशी कुणी दूर हजारो मैल
कुणी पोर बिचारे रडते आईच्या आशेवरती
भाग्यात कुणाच्या असते रत्नांची खोगीरभरती
झगमग पाहून दिपती डोळे अंधाराच्या पुत्रांचे
संपत नाही आवर्तन हे अवघड अर्ध्या मात्रांचे
पहिली मात्रा शोधत फिरते कानामधुनी कुंद हवा
भाळी प्रत्येकाच्या उमटे क्षणाक्षणाला रंग नवा



Credits
Writer(s): Milind Milind
Lyrics powered by www.musixmatch.com

Link