Dundh Varya

धुंद वाऱ्या, घाल साद...
धुंद वाऱ्या, घाल साद बावरले मन माझे
हो, धुंद वाऱ्या, घाल साद बावरले मन माझे
अधिरल्या या मनात...
अधिरल्या या मनात पाऊल कुणाचे वाजे?

धुंद वाऱ्या, घाल साद...
धुंद वाऱ्या, घाल साद...

निळी-सावळी वाट ही रानफुलांनी माखली
निळी-सावळी वाट ही रानफुलांनी माखली
स्पर्श किरणांचा होता जाई मनात लाजली

धुंद वाऱ्या, घाल साद...
धुंद वाऱ्या, घाल साद...

ओली गुलाबी पहाट अंग-अंग शहारते
ओली गुलाबी पहाट अंग-अंग शहारते
गर्द-दाट झाडीतून शीळ ओळखीची येते

धुंद वाऱ्या, घाल साद...
धुंद वाऱ्या, घाल साद...

कोकिळेचा आर्त स्वर साद घालतो कधीची
कोकिळेचा आर्त स्वर साद घालतो कधीची
वेड्या मनाचे भास हे, आस लागली भेटीची

धुंद वाऱ्या, घाल साद बावरले मन माझे
अधिरल्या या मनात...
अधिरल्या या मनात पाऊल कुणाचे वाजे?
धुंद वाऱ्या, घाल साद...
धुंद वाऱ्या, घाल साद...



Credits
Writer(s): Lata Guthe, N/a Bahgwant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link