Eka Eka Rav

ऐका-ऐका राव माणूस माझे नाव
देवाजीने दिले मला पळण्यासाठी पाय
दोन-दोन हात आणि बोटे माझी दहा
लुकुलुकू तारे जसे डोळे माझे पहा

नाक घेते श्वास आणि फुलांचा वास
चुरचुरू जीभ बोले गोरे, गोरे दात
आजीबाईच्या गोष्टी ऐकतो देऊन माझा कान
पोटामध्ये साठवून ठेवतो खाऊ छान-छान

डोक्यामध्ये अक्कल कांदे अमोल माझा भाव
गोड पापा घेती सारे लाल झाले गाल
लाल झाले गाल



Credits
Writer(s): Traditional, Shri Takwardekar Guru Ji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link