Ujadlyawari Sakhya

उजाडल्यावरी सख्या, निघून जा घराकडे
उजाडल्यावरी सख्या, निघून जा घराकडे
अजूनही उशीवरी टिपूर चांदणे पडे
उजाडल्यावरी सख्या, निघून जा घराकडे

अजूनही उशीवरी टिपूर चांदणे पडे
उजाडल्यावरी सख्या, निघून जा घराकडे
उजाडल्यावरी सख्या...

उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू?
पुन्हा-पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू?

पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे?

उजाडल्यावरी सख्या, निघून जा घराकडे
अजूनही उशीवरी टिपूर चांदणे पडे
उजाडल्यावरी सख्या, निघून जा घराकडे
उजाडल्यावरी सख्या...

अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला
अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला
अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला

अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे?
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे?

उजाडल्यावरी सख्या, निघून जा घराकडे
अजूनही उशीवरी टिपूर चांदणे पडे
उजाडल्यावरी सख्या, निघून जा घराकडे
उजाडल्यावरी सख्या...

अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी

तुला-मला विचारुनी फुटेल आज तांबडे

उजाडल्यावरी सख्या, निघून जा घराकडे
अजूनही उशीवरी टिपूर चांदणे पडे
उजाडल्यावरी सख्या, निघून जा घराकडे

उजाडल्यावरी सख्या...



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, Suresh Bhat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link