Saranga Re Saranga

वादळे उठतात, किनारे सुटतात
नशिबाशी फुटतात लाटा

वादळे उठतात, किनारे सुटतात
हो, वादळे उठतात, किनारे सुटतात
नशिबाशी फुटतात लाटा

पाऊले थकतात शेवटी अवचित
पाऊले थकतात शेवटी अवचित
जगाण्याच्या वळतात वाटा

सारंगा, रे सारंगा
हो, सारंगा, रे सारंगा

माणसा ही तुझी गोष्ट आहे जुनी
माणसा ही तुझी गोष्ट आहे जुनी
चालताना पुन्हा सांगते रे कुणी
चालताना पुन्हा सांगते रे कुणी

हुंदके सरतात, भासवे उरतात
हो, हुंदके सरतात, भासवे उरतात
जगण्याचा सलतोच काटा

हे ऋतु कोणते येत-जाती असे
हे ऋतु कोणते येत-जाती असे
जीवनाला नवे देत जाती पिसे
जीवनाला नवे देत जाती पिसे

थांबणे नसतेच, चालणे असतेच
हो, थांबणे नसतेच, चालणे असतेच
रस्त्याना फुटतोच फाटा

पाऊले थकतात शेवटी अवचित
पाऊले थकतात शेवटी अवचित
जगाण्याच्या वळतात वाटा

सारंगा, रे सारंगा
हो, सारंगा, रे सारंगा



Credits
Writer(s): Ashok Govind Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link