Dhaga Pari Shanti Rahuni

ढगा परी शांत राहुनी
ढगा परी शांत राहुनी तव माथ्यावर थांबले
तव माथ्यावर थांबले
तुला भिजविण्यासाठी मी पाऊस होऊनी आले
मी पाऊस होऊनी आले
ढगा परी शांत राहुनी

हा तुझा रे अबोला व्यक्त होण्यास आसुसलेला
हा तुझा रे अबोला व्यक्त होण्यास आसुसलेला
गुणगुणण्यासाठी ओठी तुझ्या...
गुणगुणण्यासाठी ओठी तुझ्या मी ओवी होऊनी आले
मी ओवी होऊनी आले

ढगा परी शांत राहुनी
ढगा परी शांत राहुनी

तू स्वतःला असे होरपळून का घेतले?
तू स्वतःला असे होरपळून का घेतले?
दाह शमविण्यासाठी तुझा...
दाह शमविण्यासाठी तुझा मी डोह होऊनी आले
मी डोह होऊनी आले

ढगा परी शांत राहुनी
ढगा परी शांत राहुनी

करू नकोस त्रागा, नाही अजून काही बिघडले
करू नकोस त्रागा, नाही अजून काही बिघडले
तुझ्याचसाठी राजसा...
तुझ्याचसाठी राजसा मी प्रार्थना होऊनी आले
मी प्रार्थना होऊनी आले

ढगा परी शांत राहुनी
ढगा परी शांत राहुनी तव माथ्यावर थांबले
तव माथ्यावर थांबले
तुला भिजविण्यासाठी मी पाऊस होऊनी आले
मी पाऊस होऊनी आले
ढगा परी शांत राहुनी



Credits
Writer(s): Ramesh M. Ubale, Madhukar Ziradkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link