Datta Darshanala Jayacha - Original

हे माझे पत्र त्या धन्याला, वैकुंठवासी रहातो तयाला
पत्राचा मजकूर वाचुनी पाहिला, भक्तसंकटी धावुनी आला
ही वेडीवाकुडी सेवा माझी मान्य करूनि प्रभु घेतील काय
आणि अज्ञान मूढ बालक म्हणुनी हात मस्तकी धरतील काय

हे तुझे भजना कसे करावे अरे ठाऊक मजला नाही
आणि तुझे भजना तूच करून घे अरे कलावान मी नाही
कोणी माना कोणी मानू नका यात अमुचे काय
आणि भगवंताची सर्व लेकुरे एक पिता एक माय

दत्त दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं
(आता लगीच काय?... लगीच लगीच)

दत्त दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं
(आम्ही येणार!)

अरे आनंद पोटात माझ्या... अरे वाडीला?
अरे आनंद पोटात माझ्या... औदुंबुर?... नरसोबाची वाडी राहिलीये
अरे आनंद पोटात माझ्या... अरे बाबा गाणगापूर... (हा तिकडंच जाऊया आपलं!)

अरे आनंद पोटात माझ्या माईना रे माईना
आनंद पोटात माझ्या माईना

गेलो रंभापुरी थेट घेतली दत्ताची भेट
या या डोळ्यांची भूक काही जाईना
अरे आनंद पोटात माझ्या माईना

रूप सावळं सुंदर गोजिरवाणं हे मनोहर
नजरेस आणिक काही येईना
अरे आनंद पोटात माझ्या माईना

नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्गुरू प्रेमळ
खेळ खेळिता खेळ पुरा होईना
अरे आनंद पोटात माझ्या माईना

हरीबाज पांडुरंग दत्त गारुडी अभंग
या या भजनाची हौस पुरी होईना
अरे आनंद पोटात माझ्या माईना



Credits
Writer(s): Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link