Ha Chandra Tuzhyasathi

हा चंद्र तुझ्यासाठी ही रात तुझ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी
हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी

कैफात अशा वेळी मज याद तुझी आली
येना, मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू
अनुरागी, रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू

वर्षाव तुझ्या तारुण्याचा
रिमझिमता माझ्यावरी होऊ दे
रेशीम तुझ्या लावण्याचे
चंदेरी माझ्यावरी लहरू दे

नाव तुझे माझ्या ओठांवर येते
फूल जसे की फुलताना दरवळते
इतके मज कळते, अधुरा मी येथे
चांदरात ही बघ निसटून जाते

बांधीन गगनास झुला जर देशील साथ मला
येना, मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू
अनुरागी, रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू

हे क्षण हळवे एकांताचे
दाटलेले माझ्या किती भवताली
चाहूल तुझी घेण्यासाठी
रात्र झाली आहे मऊ मखमाली

आज तुला सारे काही सांगावे
बिलगुनिया तू मजला ते ऐकावे
होऊन कारंजे उसळे मन माझे
पाऊल का अजुनी न तुझे वाजे

जीव माझा व्याकुळला, दे आता हाक मला
येना, मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू, येना
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू, येना
अनुरागी, रसरंगी होऊन ये तू, येना
नाजुकशी एक परी होऊन ये तू



Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale, Chandrashekhar Achut Sanekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link