Maitrinino Navrila Halad Lawa Ga

मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं
(मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं)

राजवरखी सोनबिंदी भांगात जडवा
कस्तुरली मोतीपाणी देहावर उडवा
राजवरखी सोनबिंदी भांगात जडवा
कस्तुरली मोतीपाणी देहावर उडवा

पहिला मान विडा ठेवा गणपती देवा गं
मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं
(मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं)

काशी आणि रामेश्वर, सासर-माहेर
नवरदेव-नवरी जसे गंगा आणि सागर
काशी आणि रामेश्वर, सासर-माहेर
नवरदेव-नवरी जसे गंगा आणि सागर

लेकी आम्ही साऱ्या जशा नदीतल्या नावा गं
मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं
(मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं)

हिरवा चुडा भरला हा कपाळी चांदवा
अहो दाजी, आमची आक्का आनंदात नांदवा
हिरवा चुडा भरला हा कपाळी चांदवा
अहो दाजी, आमची आक्का आनंदात नांदवा

जन्मोजन्मी लाभो हाच सौभाग्याचा ठेवा गं
मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं
(मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं)

मायबाप रडतील जाशील तू सासरी
घडोघडी आठवेल मालन तू हासरी
मायबाप रडतील जाशील तू सासरी
घडोघडी आठवेल मालन तू हासरी

जन्मभर पाठीराखा बंधुभराजा व्हावा गं
मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं
मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं

(मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं)
(मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं)
(मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं)
(मैत्रिणींनो नवरीला हळद लावा गं, बाई हळद लावा गं)

Credits
Writer(s): Bal Palsule, Baba Saudagar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link