Mala Lagli Kunachi Uchki

हं, आता गं बया
हं, काय झालं?
अगं, हो-हो-हो-हो-हो
अशी कुठं चालली ही?
पैंजम्यात गस्त खात, आ

आली-आली सुगी म्हणुन चालले बिगी-बिगी
गोष्ट न्हाई सांगन्याजोगी, गोष्ट न्हाई सांगन्याजोगी
कुणी गालावर मारली टिचकी

मला लागली कुणाची उचकी?
अहो, मला लागली कुणाची उचकी?
(कुणाची गं, कुणाची, ह्याची? का त्याची?)
(लाजू नको, लाजू नको, लाजू नको)
(मला लागली कुणाची उचकी?)

तरणी-ताठी नार शेलाटी
चढले मी बांधावर
अटकर बांधा, गोरा-गोरा खांदा
पदर वाऱ्यावर

कानामध्ये चाहुल, वाजलं त्याचं पाऊल
माझ्या उरात भरली धडकी

मला लागली कुणाची उचकी?
अहो, मला लागली कुणाची उचकी?
(कुणाची गं, कुणाची, ह्याची? का त्याची?)
(लाजू नको, लाजू नको, लाजू नको)
(मला लागली कुणाची उचकी?)

निजले डाव्या कुशी हाताची
उशी करून मी तशी
वाऱ्याच्या लाटा, थंडीचा काटा
मनात न्यारी खुशी

सपनात आला, त्यानं छेडलं बाई मला
त्याच्या डोळ्याची नजर तिरकी

मला लागली कुणाची उचकी?
अहो, मला लागली कुणाची उचकी?
(कुणाची गं, कुणाची, ह्याची? का त्याची?)
(लाजू नको, लाजू नको, लाजू नको)
(मला लागली कुणाची उचकी?)

उठून सकाळी लई येरवाळी
गेले पाणवठ्यावरी
उन्हात बसले न्हात अंगाला
पानी गुदगुल्या करी

पाण्यामध्ये दिसं, त्याचं लागलं मला पिसं
त्यान माझीच घेतली फिरकी

मला लागली कुणाची उचकी?
अहो, मला लागली कुणाची उचकी?
(कुणाची गं, कुणाची, अ)
(कुणाची गं, कुणाची, अ)

(ह्याची? का त्याची?)
(लाजू नको, लाजू नको, लाजू नको)
(मला लागली कुणाची, अ?)



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link