Ti Yete Aanik Jate

ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते
ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते
अन जाताना फुले मागते
ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते

येणे-जाणे, देणे-घेणे
येणे-जाणे, देणे-घेणे
असते गाणे जे ना कधी ती म्हणते

ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते
अन जाताना फुले मागते
ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते
ती येते...

येताना कधी अशी लाजते
येताना कधी अशी लाजते
तर जाताना ती लाजविते
तर जाताना ती लाजविते

कळते काही उगीच ती ही
कळते काही उगीच ती ही
नकळत पाही काही बाही
अर्थावाचुन उगीच "नाही, नाही" म्हणते

ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते
अन जाताना फुले मागीते
ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते
ती येते...

येतानाची कसली रीत?
येतानाची कसली रीत?
गुणगुणते ती संध्यागीत
येतानाची कसली रीत?
गुणगुणते ती संध्यागीत
जाताना कधी फिरून येत
जाण्यासाठीच दुरुन येत
विचित्र येते, विरून जाते जी ती सलते

ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते
अन जाताना फुले मागते
ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते



Credits
Writer(s): Aarti Prabhu, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link