Aanandachya Gavala

आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो
आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो

उत्सव हा प्राणांनी मी जेव्हा पाहतो
हृदयाला आशेचे तारे लावतो
आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो

हे, आकाश चांदण्याचे, हरखून पाहण्याचे
वाळूत लोळुनी या निशब्द राहण्याचे
हे-हे, वाऱ्यातल्या नशेने श्वासात वाहण्याचे
संगीत हे अनादी हृदयात ऐकाण्याचे

उत्सव हा प्राणांनी मी जेव्हा पाहतो
हृदयाला आशेचे तारे लावतो

आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो
आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो

ही वेळ एकट्याने तंद्रीत चालण्याची
स्वप्नतल्या सुखांना सत्यात पाहण्याची
हे-हे, आकाश पांघरूनी चंद्रात न्हाहण्याची
आनंदुनि जगी या आनंद वाटण्याची

उत्सव हा प्राणांनी मी जेव्हा पाहतो
हृदयाला आशेचे तारे लावतो
आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो

आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो
उत्सव हा प्राणांनी मी जेव्हा पाहतो
हृदयाला आशेचे तारे लावतो

आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो
आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो



Credits
Writer(s): Milind Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link