Ghan Aaj Barse

सुख पावसापरी यावे, आयुष्य अन् हे भिजावे
सुख पावसापरी यावे, आयुष्य अन् हे भिजावे
स्पर्शून आसवांना ह्या मातीत ओल्या रुजावे
जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो

घन आज बरसे मनावर हो
घन आज बरसे अनावर हो
चाहूल कुणाची त्यावर हो?
घन आज बरसे अनावर हो

सुख पावसापरी यावे, आयुष्य अन् हे भिजावे
स्पर्शून आसवांना ह्या मातीत ओल्या रुजावे
जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो

घन आज बरसे मनावर हो
घन आज बरसे अनावर हो
चाहूल कुणाची त्यावर हो?
घन आज बरसे अनावर हो

घेऊन गिरकी पानांवरती थेंब उतरले
वार्याच्याही पायी वाजती पैंजण ओले
हो, घेऊन गिरकी पानांवरती थेंब उतरले
वार्याच्याही पायी वाजती पैंजण ओले

ही भूल सावळी पडे
ही भूल सावळी पडे, झिरपले धुके हिरव्या रानावर हो

घन आज बरसे मनावर हो
घन आज बरसे अनावर हो
चाहूल कुणाची त्यावर हो?
घन आज बरसे अनावर हो

अंगणातल्या मातीलाही सुचती गाणी
थेंब मोतिया खळखळ करती ओली नाणी
हो, अंगणातल्या मातीलाही सुचती गाणी
थेंब मोतिया खळखळ करती ओली नाणी

तो गंध भारतो पुन्हा
तो गंध भारतो पुन्हा मनास वेड्या, शिडकावा पानावर हो

घन आज बरसे मनावर हो
घन आज बरसे अनावर हो
चाहूल कुणाची त्यावर हो?
घन आज बरसे अनावर हो

मिटले आता मधले अंतर पाऊस पडून गेल्यानंतर, पाऊस पडून गेल्यानंतर
घडून जाईल नाजुक ओले काही, मन होईल हळवे कातर, मन होईल हळवे कातर

पाऊस येईल पुन्हा
पाऊस येईल पुन्हा नीज मोडाया, मग येऊ भानावर हो

घन आज बरसे मनावर हो
घन आज बरसे अनावर हो
चाहूल सुखाची त्यावर हो?
घन आज बरसे अनावर हो



Credits
Writer(s): Nilesh Moharir, Ashwini C. Shende
Lyrics powered by www.musixmatch.com

Link