Hi Re Man

वळणावरी जणू चाहुल लागली
वाऱ्यासवे कुणी ये चोरपावली
आभाळ मोकळे माझे मला मिळे
स्वप्नास मी लावले पंख हे नवेसे
मन हे पाखरू, कसे मी सावरू
नकळत कोणत्या दिशेला जाई सांग ना
उलगडते कसे अबोल नाते बोल ना

पाखरा पाखरा रे
दूरच्या देशी उडुनी जाशी
मला ही नेशी सोबतीने

गुंतलेल्या क्षणी सावरू वाटते
सोडवूनी पुन्हा मन कसे गुंतते
रानभर कसे मोरपंखी ठसे
होई वेडेपिसे असे मन पाखरू
आसमंती दिसे कसे मन पाखरू
क्षण एक भेटते विरतेच सावली
वाऱ्यासवे कुणी ये चोरपावली
आभाळ मोकळे माझे मला मिळे
स्वप्नास मी लावले पंख हे नवेसे
मन हे पाखरू
सावरू मी कसे ना कळले
भिरभिरू लागे, गुणगुणू लागे
बागडावे जसे मन पाखरू



Credits
Writer(s): Amit Sur, Vaibhav Pralhad Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link