Hanumanta Bhaiya Hanumanta

देव पावता हनमंता रे
देव पावता हनमंता रे
मनासारखे होईल सारे
हनमंता, माझ्या हनमंता
हनमंता, माझ्या हनमंता

मागू जे-ते येईल हाती
राज्य करूया गावावरती
नाही कुणाची कसली भीती
पडतील सारे पायावरती

हनमंता, माझ्या हनमंता
हनमंता, माझ्या हनमंता

या राजाची निघलं स्वारी
या राजाची निघलं स्वारी
डोक्यावरती कंदील भारी
अंगरखा तर भरजरतारी
अन गळ्यात माळा १६ पदरी

हनमंता, माझ्या हनमंता
हनमंता, माझ्या हनमंता

माझ्यापरी मी तुजला सजविन
सोन्याने तुज उभाच मढविन
शिपाही प्याधे ठेवीन राखण

चांदीची तुज आणीन माखन

हनमंता, माझ्या हनमंता
हनमंता, माझ्या हनमंता

माखणीतल्या चार घागरी
रत्ने खचवू खूप त्यावरी
छत्री धरुनी येतील कोणी

छत्री धरुनी येतील कोणी
सावलीतुनी आणू पाणी

नकोत तू पण आणू पाणी
तोवरी येईल माझी राणी
फार देखणी जशी चांदणी
गुणी, लाडकी, सुंदर सजणी



Credits
Writer(s): G D Madgulkar, P L Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link