Aaik Rama Tithala Ha Dastur

जाऊनी आलो, पाहुनी आलो
जाऊनी आलो, पाहुनी आलो
तीर्थ पंढरपूर, हो, तीर्थ पंढरपूर

ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर

जाऊनी आलो, पाहुनी आलो
जाऊनी आलो, पाहुनी आलो
तीर्थ पंढरपूर, हो, तीर्थ पंढरपूर

ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर

सवर्णीयांना तेथे वाव...
सवर्णीयांना तेथे वाव, अस्पृश्यांना परि मज्जाव
सवर्णीयांना तेथे वाव, अस्पृश्यांना परि मज्जाव

टाळकरी अन माळकरी ते
टाळकरी अन माळकरी ते
येती तिथे भरपूर, हो, येती तिथे भरपूर

ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर

भोळेपणाची साक्ष देते...
भोळेपणाची साक्ष देते समाज आपला जाता तेथे
भोळेपणाची साक्ष देते समाज आपला जाता तेथे

पाहून बडवे, बोलती कडवे
पाहून बडवे, बोलती कडवे
म्हणती, "व्हा दूर-दूर," हो, म्हणती, "व्हा दूर-दूर"

ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर

मंदिराच्या बाहेर चोखा...
मंदिराच्या बाहेर चोखा माहीत आहे अवघ्या लोका
मंदिराच्या बाहेर चोखा माहीत आहे अवघ्या लोका

ज्याची हाडे विठ्ठल-विठ्ठल
ज्याची हाडे विठ्ठल-विठ्ठल
काढीत होते सूर, हो, काढीत होते सूर

ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर

नागभूमीचा महिमा पटविन...
नागभूमीचा महिमा पटविन, पंढरपूर ते नवीन बसविन
नागभूमीचा महिमा पटविन, पंढरपूर ते नवीन बसविन

रणधीर आणि समाज होईल
रणधीर आणि समाज होईल
पहावया आतुर, हो, पहावया आतुर

ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर

जाऊनी आलो, पाहुनी आलो
जाऊनी आलो, पाहुनी आलो
तीर्थ पंढरपूर, हो, तीर्थ पंढरपूर

ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर
ऐक रमा तिथला हा दस्तुर
अगं, ऐक रमा तिथला हा दस्तुर
ऐक रमा तिथला हा दस्तुर



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Janardhan Randira
Lyrics powered by www.musixmatch.com

Link