Unad Paus

उनाड पाऊस, अशांत पाऊस, अधीर भिरभिरणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस

हाक तृषेची येता कानी मातीची ऐकून विराणी
मेघांच्या कुंभातुन बरसे अमृतमय जलधारा पाऊस

प्राण नवे झाडांना देई, गीत नवे पक्षांना देई
बैरागी रानातुन फिरवी शांत-शीतल वारा पाऊस

पहाड-राने नदी-सरोवर ऊरा-उरी भेटून साऱ्यांना
एकाएकाला लावून जाई सृजनाचा भंडारा पाऊस



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link