Yand Hi Hava

थंड ही हवा, धुंद गारवा
हा पाऊस रिमझिम बरसे
हो, पाऊस रिमझिम-रिमझिम बरसे
थंड ही हवा...

रेशीमधारा या रुणझुणती
जलथेंबाचे उधळीत मोती
पान-फुले नाचती, ओ, गंधफुले भोवती
झुलती जलाचे आरसे

थंड ही हवा...

काजळकाळ्या या आकाशी
वीज रेखिते सुंदर नक्षी
वारा खुळा होऊनी, ओ, नाचे कसा अंगणी
गाणे खुशीचे गात असे

थंड ही हवा...

हिरवी शेते, हिरवी राने
फुलली भवती हिरवी कवने
नटली बघा ही धरा, ओ, झोक तिचा साजिरा
नवरी नवेली ही दिसे

थंड ही हवा, धुंद गारवा
हा पाऊस रिमझिम बरसे
हो, पाऊस रिमझिम-रिमझिम बरसे

थंड ही हवा, धुंद गारवा
हा पाऊस रिमझिम बरसे
हो, पाऊस रिमझिम-रिमझिम बरसे

हो, पाऊस रिमझिम-रिमझिम बरसे
हो, पाऊस रिमझिम...



Credits
Writer(s): Vandana Witnakar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link