Re Kshanachya Sangteen - Original

रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले
रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले
वेड वेडे घेऊनी मी मागुती तंव धावले
रे क्षणाच्या संगतीने...

ध्यास लागे सारखा, आभास होती या जिवा
अंतरी तुजला स्मरावे, छंद लागे हा नवा

या जगाच्या निंदकाचे मी हलाहल प्राशिले
रे क्षणाच्या संगतीने...

संपदा लाभो करी वा दैन्य कोरांटीपरी
तृप्त मी होईन, नाथा, दो करांच्या कोटरी

आवरीता आवरे ना झिंगलेली पाऊले
रे क्षणाच्या संगतीने...

ना भिती जन-नीतीची, मज तू उभा मागे-पुढे
रे नको मज स्वर्ग जेथे लाभ देवाचा घडे

तारि आता तूच माझ्या देही भिनली वादळे
रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले
रे क्षणाच्या संगतीने...



Credits
Writer(s): Dashrath Pujari, Ram More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link