Gupit Ek Sangate Dupari - Original

सहज तुला-, सांगते दुपारी

सहज तुला गुपित एक सांगते दुपारी
डोळीयांत आली, गडे, प्रीत माझी लाजरी
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी

बैसते ओटीवरी, नजर वळे अंगणी
बैसते ओटीवरी, नजर वळे अंगणी
अंगणात बहरते रानजाई देखणी

जाई खाली उभा असे हासरा शिकारी
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी

सांजवेळी गोठ्यातली गाय लागे हंबरू
ओ, सांजवेळी गोठ्यातली गाय लागे हंबरू
सोडते गं धारेसाठी, ओढ घेई वासरू

गोठ्यामध्ये दिसे, सखे, सावळा मुरारी
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी

पहाटेला ओठावरी गीत एक जागले
पहाटेला ओठावरी गीत एक जागले
अंतरात कोणसे, हळुच बाई बोलले

ओढळले मन नेई माझिया सासरी
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी
डोळीयांत आली, गडे, प्रीत माझी लाजरी
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी



Credits
Writer(s): Ashokji Paranjape, Ashok Govind Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link