Naam Gheta Mukhi Raghavache - Original

नाम घेता मुखी राघवाचे

नाम घेता मुखी राघवाचे
नाम घेता मुखी राघवाचे
दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे
दास रामाचा हनुमंत नाचे

अंजनी उदरी जन्मला
भक्षिण्या रवी धावला
अंजनी उदरी जन्मला
भक्षिण्या रवी धावला

धावणे वायुपरी ज्याचे, हो
धावणे वायुपरी ज्याचे, हो
दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे
दास रामाचा हनुमंत नाचे

रूप मेरूपरी घेऊनी
तरू पाहे सिंधू लंघुनी
रूप मेरूपरी घेऊनी, हो
तरू पाहे सिंधू लंघुनी

करुनिया दहन लंकेचे, लंकेचे
करुनिया दहन लंकेचे, दहन लंकेचे
हो, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे
दास रामाचा हनुमंत नाचे

जमवुनी वानरे सारी
बांधिला सेतू सागरी
जमवुनी वानरे सारी
बांधिला सेतू सागरी

बळ महान बाहुबलीचे, हो
बळ महान बाहुबलीचे, हो
दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे
दास रामाचा हनुमंत नाचे

नित रमे राम जपतपी, हो
नित रमे राम जपतपी
जाहला अमर तो कपी

गुण गाता, हो
गुण गाता रघुसेवकाचे
हो, दास रामाचा हनुमंत नाचे
नाम घेता मुखी राघवाचे

दास रामाचा हनुमंत नाचे
हो, दास रामाचा हनुमंत नाचे



Credits
Writer(s): Anna Joshi, Neelkanth Abhyankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link