Manas Pooja

नमो स्वामी राजम दत्तावतारम ||
श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम ||
ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय ||
स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||
हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा ||
मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||
कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा ||
समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||
स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी ||
हृदयासनी या बसा प्रार्थितो मी ||
पूजेचे यथासांग साहित्य केले ||
मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||
महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती ||
जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ ||
परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||
सुवर्ण ताटी महारत्न ज्योती ||
ओवाळोनी अक्षता लावू मोती ||
शुभारंभ ऐसा करूनी पूजेला ||
चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ ||
हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा ||
तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा ।।
प्रणिपात साष्टांग शरणागताचा ||
तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||
ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा ||
शिव शंकराची असें शक्तिपूजा ||
दहीदुध शुद्धोदकाने तयाला ||
पंचामृती स्नान घालू प्रभूला || ६ ||
वीणा तुतार्या किती वाजताती ||
शंखादि वाद्ये पहा गर्जताती ।।
म्हणती नगारे गुरूदेव दत्त ||
श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||
प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली ||
श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली।।
महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया ||
महिमा तयांचा कळता जगा या || ८ ||
मीं धन्य झालो हे तीर्थ घेता ||
घडू दे पूजा ही यथासांग आता।।
अजानबाहू भव्य कांती सतेज ||
नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||
प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज ||
तया घालुया रेशिमी वस्त्र साज ||
सुगंधित भाळी टीळा रेखियेला ||
शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||
वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा ||
सुवास तो वाढवी भाव साचा ||
शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते ||
गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||
गंधाक्षता वाहूनीया पदाला ||
ही अर्पूया जीवन पुष्प माला ||
चरणी करांनी मिठी मारू देई ||
म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||
इथें लावुया केशर कस्तुरीचा ||
सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा ||
पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली ||
गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||
करूणावतारी अवधूत कीर्ति ||
दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती ||
प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची ||
अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४ ||
हृदमंदिराची ही स्नेह ज्योती ||
मला दाखवी स्वामिची योगमुर्ति ||
करू आरती आर्त भावे प्रभूची ||
गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||
पंचारती ही असे पंचप्राण ||
ओवाळूनी ठेवू चरणा वरून ||
निघेना पुढें शब्द बोलू मी तोही ||
मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||
हे स्वामीराजा बसा भोजनाला ||
हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ||
पुरणाची पोळी तुम्हा आवडीची ||
लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||
डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा ||
हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा ||
पुढें हात केला या लेकरानें ||
प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||
तांबुल घ्यावा स्वामी समर्था ||
चरणाची सेवा करू द्यावी आता ||
प्रसन्नतेतून मागू मी काय ||
हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||
सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू ||
दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ ||
नको दूर लोटू आपुल्या मुलासी ||
कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||
धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला ||
पदी ठेवू दे शीर शरणा गताला ||
हृदयी भाव यावें असे तळमळीचे ||
करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||
तुझें बाळ पाही तुझी वाट देवा ||
नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा ||
मनी पूजनाची असे दिव्य ठेव ||
वसो माझीया अन्तरी स्वामी देव
वसो माझीया अन्तरी स्वामी देव
वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ ||



Credits
Writer(s): Dp, Bharat Balavalli
Lyrics powered by www.musixmatch.com

Link