Ladki Shakuntala - Version 2

सासुऱ्यास चालली लाडकी शकुंतला
चालली शकुंतला
चालतो तिच्यासवे, तिच्यात जीव गुंतला
चालली शकुंतला, लाडकी शकुंतला

ढाळतात आसवे मोर, हरिणशावके
मूक आज जाहले सर्व पक्षी बोलके

यापुढे सखी, नुरे माधवी लते तुला
चालली शकुंतला, लाडकी शकुंतला

पान-पान गाळुनी दुःख दाविती तरू
गर्भिणी मृगी कुणी वाट ये तिची धरू

दंती धरुन पल्लवा आडवी खुळी तिला
चालली शकुंतला, चालली शकुंतला

भावमुक्त मी मुनी...
भावमुक्त मी मुनी, मला न शोक आवरे
जन्म दास सोसने दुःख हे कसे बरे

कन्यका न कनककोष मी धन्यास अर्पिला
चालली शकुंतला, चालली शकुंतला



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link