Suni Sanj Hi Suni

सुनी, सांज ही सुनी
सुनी, सांज ही सुनी, सुनी
अंधकार हा दाटून आला
अंधकार हा दाटून आला

तू नाही शेजारी, साजणी
सुनी, सांज ही सुनी
सुनी, सांज ही सुनी, सुनी

दिवस सरला, चंचल वारा
दिवस सरला, चंचल वारा
सळसळत्या लाटांचा शहारा
नभी उगवला सांजतारा
नभी उगवला सांजतारा

राहिली रात अधुरी
राहिली रात अधुरी
सुनी, सांज ही सुनी
सुनी, सांज ही सुनी, सुनी

दिसशी मजला अवती-भवती
मृगजळापरी भास होती
गात आहे विरह गाणी
तू कुठे साजणी?
तू कुठे साजणी?

सुनी, सांज ही सुनी, सुनी
सुनी, सांज ही सुनी, सुनी

अशा वेळी कातरवेळी
अशा वेळी कातरवेळी
सोबत मजला माझी सावली
सरली रजनी, पहाट झाली
सरली रजनी, पहाट झाली

वाट तुझी पाहिली
वाट तुझी पाहिली
सुनी, सांज ही सुनी, सुनी
अंधकार हा दाटून आला
अंधकार हा दाटून आला

तू नाही शेजारी, साजणी
सुनी, सांज ही सुनी
सुनी, सांज ही सुनी, सुनी



Credits
Writer(s): Makarand Behere
Lyrics powered by www.musixmatch.com

Link