Datach Datvan Ghya Ga Kuni

दाताचं दात्वन घ्या गं कुणी
दाताचं दात्वन घ्या गं कुणी
कुंकू घ्या, कुणी काळ मणी
बाई, सूया घे गं, दाभन घे
बाई, सूया घे गं, दाभन घे

दाताचं दात्वन घ्या गं कुणी
दाताचं दात्वन घ्या गं कुणी
कुंकू घ्या, कुणी काळ मणी
बाई, सूया घे गं, दाभन घे
बाई, सूया घे गं, दाभन घे
बाई, सूया घे गं, दाभन घे
चकण्या डोळ्याच्या राधा बाई
तुम्हा काजळ शोभा देई
आखूड केसांच्या गोदा ताई
तुम्ही केसारी वापरा बाई

चकण्या डोळ्याच्या राधा बाई
तुम्हा काजळ शोभा देई
आखूड केसाच्या गोदा ताई
तुम्ही केसारी वापरा बाई

टकमका बघतील साऱ्या जणी
कुंकू घ्या, कुणी काळ मणी
बाई, सूया घे गं, दाभन घे
बाई, सूया घे गं, दाभन घे
बाई, सूया घे गं, दाभन घे
खाली बसा हो बाई साहेब जरा
डोकं खाजवू नका खरखरा
भांगा-भांगात powder भरा
ऊवा लेखांचा नायनाट करा

खाली बसा हो बाई साहेब जरा
डोकं खाजवू नका खरखरा
भांगा-भांगात powder भरा
ऊवा लेखांचा नायनाट करा

ऊवांची घ्या ही बारीक फणी
कुंकू घ्या, कुणी काळ मणी
बाई, सूया घे गं, दाभन घे
बाई, सूया घे गं, दाभन घे
बाई, सूया घे गं, दाभन घे
तुमच्या तानुल्या, गुजीऱ्या बाळा
घ्या मनगटी, पायात वाळा
मग तो गोरा असो की काळा
दृष्ट मण्यांच्या घ्या या माळा

तुमच्या तानुल्या, गोजिऱ्या बाळा
घ्या मनगटी, पायात वाळा
मग तो गोरा असो की काळा
दृष्ट मण्यांच्या घ्या या माळा

पोपट बाहुली, घ्या चिमणी
कुंकू घ्या, कुणी काळ मणी
बाई, सूया घे गं, दाभन घे
बाई, सूया घे गं, दाभन घे
बाई, सूया घे गं, दाभन घे
जीव लाविता जसा सोन्याला
जपा बायांनो काळ्या मण्याला
मागा आयुक आपल्या धन्याला
काळी पोत घ्या १२ आण्याला

जीव लाविता जसा सोन्याला
जपा बायांनो काळ्या मण्याला
मागा आयुक आपल्या धन्याला
काळी पोत घ्या १२ आण्याला

सावित्री, अवं रुक्मीणी
कुंकू घ्या, कुणी काळ मणी
बाई, सूया घे गं, दाभन घे
बाई, सूया घे गं, दाभन घे
बाई, सूया घे गं, दाभन घे

दाताचं दात्वन घ्या गं कुणी
दाताचं दात्वन घ्या गं कुणी
कुंकू घ्या, कुणी काळ मणी
बाई, सूया घे गं, दाभन घे
बाई, सूया घे गं, दाभन घे

घेव माय, घेव माय
अगं, घे माय



Credits
Writer(s): Prakash Pawar, Ashok Waingankar, Vishram Bhvate
Lyrics powered by www.musixmatch.com

Link