Tu Havishi (From "Online Binline")

स्वप्न कि आभास हा, वेड लावी ह्या जिवा
वेगळी दुनिया तरिही ओळखीची

तू हवीशी, मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
भास सारे कालचे आज ते झाले खरे
तरी का हुरहुर वाटे आपुलीशी?

तू हवीशी, मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी

हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती
तोच वाऱ्याचा शहारा, श्वास का गंधाळती?
हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती
तोच वाऱ्याचा शहारा, श्वास का गंधाळती?

सोबतीने चालते, भोवताली वाहते
पंख जुळले या मनाचे त्या मनाशी
हो, तू हवीशी, मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी

पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला
मी तुझी होऊन गेले, विसरली माझी मला
पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला
मी तुझी होऊन गेले, विसरली माझी मला

काय जादू सांगना हरवुनी जाता पुन्हा
कोवळेसे ऊन आले सावलीशी
तू हवीशी, मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी

भास सारे कालचे आज ते झाले खरे
तरी का हुरहुर वाटे आपुलीशी?



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Nilesh Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link