Maaganya Aadhich

मागण्या आधीच माझी सावली होऊन ये
बोलण्या आधीच सारे गुज तू जाणून घे
मागण्या आधीच माझी सावली होऊन ये
बोलण्या आधीच सारे गुज तू जाणून घे

आस नाही मला त्या चंद्र चांदण्यांची
आस नाही मला त्या चंद्र चांदण्यांची
श्वास तू होशील माझा एवढा विश्वास दे

मागण्या आधीच माझी सावली होऊन ये
बोलण्या आधीच सारे गुज तू जाणून घे

मिसळू दे लाटात-लाटा एक होऊ दे किनारे
मिसळू दे लाटात-लाटा एक होऊ दे किनारे
या मनीचे त्या मनाला आज समजू देत सारे

वेड लागे या जिवाला तू असास हवास दे
वेड लागे या जिवाला तू असास हवास दे
श्वास तू होशील माझा एवढा विश्वास दे

मागण्या आधीच माझी सावली होऊन ये
बोलण्या आधीच सारे गुज तू जाणून घे

हो, नाद येवु देत कानी सुखाच्या पावलांचे
नाद येवु देत कानी सुखाच्या पावलांचे

उंबऱ्या बाहेरं विरुदे सुर सारे वादळाचे
संशयाचे ढग नको मोकळे आकाश दे
संशयाचे ढग नको मोकळे आकाश दे
श्वास तू होशील माझा एवढा विश्वास दे

मागण्या आधीच माझी सावली होऊन ये
बोलण्या आधीच सारे गुज तू जाणून घे



Credits
Writer(s): Guru Thakur, Nilesh Vijay Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link