Sakhi Mand Jhalya Taraka

सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशील का? येशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका

मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला
हा प्रहर अंतिम राहिला
त्या अर्थ तू देशिल का? देशिल का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका

हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीत ही
हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, प्रेमगाणे छेडणारा
सूर तू होशिल का? होशिल का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका

जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तरी ही उरे काही उणे
तू पूर्तता होशिल का? होशिल का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, थांबेल तो ही पळभरी
पण सांग तू येशिल का? येशिल का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशील का? येशील का?
सखी मंद झाल्या तारका



Credits
Writer(s): Ram Pathak, Sudhir Moghe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link