Jeev Pisatala

वेड लावे जीवाला बघुनि तुला
पास असूनी तुझी आस लागे मला
वेड लावे जीवाला बघुनि तुला
पास असूनी तुझी आस लागे मला

एक क्षणही नकोसा दुरावा तुझा
श्वास माझा म्हणू की पुरावा तुझा
काय होणार माझे कळे ना मला
प्रेम छळते किती हे मला अन् तुला

जीव पिसाटला पिसाटला रामा
हे, जीव पिसाटला पिसाटला रामा
जीव पिसाटला पिसाटला रामा

बोलणे हे तुझे
हो, बोलणे हे तुझे की फुलांचा सडा
हासता किणकिणे चांदण्यांचा चुडा
हो, बोलणे हे तुझे की फुलांचा सडा
हासता किणकिणे चांदण्यांचा चुडा
एवढासाच शृंगार पुरतो तुला
दृष्ट लागो न माझीच माझ्या फुला

जीव पिसाटला पिसाटला रामा
हे, जीव पिसाटला पिसाटला रामा
जीव पिसाटला पिसाटला रामा

तूच तू सोबती तूच दाहीदिशा
प्यासही तूच अन् तूच माझी नशा
सावली तू कधी तू उन्हाच्या झळा
सांग डोळ्यांत लपवू कसा मी तुला
रंग झालो तुझा रंगता रंगता
आग पानी जणू एक झाले आता

जीव पिसाटला पिसाटला रामा
जीव पिसाटला पिसाटला रामा
हो, जीव पिसाटला पिसाटला रामा



Credits
Writer(s): Vaibhav Pralhad Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link