Ya Sukhano Ya

या, सुखांनो या, या, सुखांनो या
या, सुखांनो या, या, सुखांनो या
जीवनाच्या मैफलीची...
जीवनाच्या मैफलीची रीत इतके सांगते
हे गीत गावे लागते, गाणे जगावे लागते

जगणे तराने व्हायला, अजुनी लकेरी घ्यायला
या आपले ही सूर द्या

या, सुखांनो या, या, सुखांनो या
या, सुखांनो या, या, सुखांनो या
दूर आकाशामध्येही विहरणारी पाखरे
पाखरे समजायची की आठवांचे भोवरे
सांजावल्या डोळ्यातूनी झळतात स्नेहाचे झरे

वाट पाहून हे पुन्हा आभाळ आहे दाटले
ती आठवे, ते चेहरे, ती पाखरे होऊन या

या, सुखांनो या, या, सुखांनो या
या, सुखांनो या, या, सुखांनो या
उंच झोका देऊनी जातात स्वप्न गोजिरी
डोलते आशा-निराशा रोज त्या तालावरी
कधी हात ना हातामध्ये, कधी पाय ना जमिनीवरी

एक छोटे स्वप्न आहे निसटले हातातूनी
ती चिमुकली आशा पुन्हा माझ्या घरी घेऊन या

या, सुखांनो या, या, सुखांनो या
या, सुखांनो या, या, सुखांनो या



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link