Utha Rashtraveer

उठा राष्ट्रवीर हो, सुसज्ज व्हा उठा चला
सशस्त्र व्हा उठा चला, उठा

युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
(युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे)
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
(मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे)

एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा-उठा, चला-चला
उठा राष्ट्रवीर हो, सुसज्ज व्हा उठा चला
सशस्त्र व्हा उठा चला, उठा

वायुपुत्र होऊनी धरु मुठीत भास्करा
(वायुपुत्र होऊनी धरु मुठीत भास्करा)
होऊनी अगस्तिही पिऊन टाकू सागरा
(होऊनी अगस्तिही पिऊन टाकू सागरा)

रामकृष्ण होऊया, समर्थ होऊया चला
उठा-उठा, चला-चला
उठा राष्ट्रवीर हो, सुसज्ज व्हा उठा चला
सशस्त्र व्हा उठा चला, उठा

चंद्रगुप्त वीर तो फिरुन आज आठवू
(चंद्रगुप्त वीर तो फिरुन आज आठवू)
शूरता शिवाजीची नसा-नसात साठवू
(शूरता शिवाजीची नसा-नसात साठवू)

दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा-उठा, चला-चला
उठा राष्ट्रवीर हो, सुसज्ज व्हा उठा चला
सशस्त्र व्हा उठा चला, उठा

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
(यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती)
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
(दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती)

देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा-उठा, चला-चला
उठा राष्ट्रवीर हो, सुसज्ज व्हा उठा चला
सशस्त्र व्हा उठा चला, उठा



Credits
Writer(s): Ravindra Bhat, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link