Chaalte Nane

चालते नाणे जयाचे, फक्त आहे भाव त्याला
चालते नाणे जयाचे, फक्त आहे भाव त्याला
भाव सरता, नाव विरते...
भाव सरता, नाव विरते, घाव त्याचा काळजाला

चालते नाणे जयाचे, फक्त आहे भाव त्याला
भाव सरता, नाव विरते...
भाव सरता, नाव विरते, घाव त्याचा काळजाला
चालते नाणे जयाचे, फक्त आहे भाव त्याला

जोडल्याविन हात जातो रोजचा भाविकही
जोडल्याविन हात जातो रोजचा भाविकही
त्या क्षणाला शेंदराचे...
त्या क्षणाला शेंदराचे मोल कळते पत्थराला
चालते नाणे जयाचे, फक्त आहे भाव त्याला

सूर जुळता ऐकू येती हुंदक्यातूनही तराने
सूर जुळता ऐकू येती हुंदक्यातूनही तराने
मी पणाचा डंक होता...
मी पणाचा डंक होता मैफिली जाती लयाला

चालते नाणे जयाचे, फक्त आहे भाव त्याला
भाव सरता, नाव विरते...
भाव सरता, नाव विरते, घाव त्याचा काळजाला
चालते नाणे जयाचे, फक्त आहे भाव त्याला



Credits
Writer(s): Guru Thakur, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link