Choratyancha Fada

तुझ्या भरवशाचे देवा, कुठं गाव गेले?
अन उघड्या घराला आता कडी-दार आले
पायरीला गेले तडे, पाय झाले जड
पायरीला गेले तडे, पाय झाले जड
आरं देवा, तुझ्या देवळात चोरट्यांचा फड
चोरट्यांचा फड

(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
(आरं देवा रं, माझ्या राजा रं)

पायरीला गेले तडे, पाय झाले जड
आरं देवा, तुझ्या देवळात चोरट्यांचा फड
चोरट्यांचा फड

(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
गळा शपथांची रीत, होता नजरेचा धाक
(होता नजरेचा धाक, होता नजरेचा धाक)
गळा शपथांची रीत, होता नजरेचा धाक
शब्दांसाठी मरणारे कैवारी ही लाख
(कैवारी ही लाख, कैवारी ही लाख)

पेरलेल्या संस्कारांचे खुरटले मोड
पेरलेल्या संस्कारांचे खुरटले मोड
आरं देवा, तुझ्या देवळात चोरट्यांचा फड
चोरट्यांचा फड

(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
अंधाराशी सलगी झाली, उजेडाची येते भीती
(उजेडाची येते भीती, उजेडाची येते भीती)
हो, अंधाराशी सलगी झाली, उजेडाची येते भीती
आपणच आपल्याशी जडवावी प्रीती
(आपणच आपल्याशी जडवावी प्रीती)

माणसांना तुझी आता राहिली ना नड
माणसांना तुझी आता राहिली ना नड
आरं देवा, तुझ्या देवळात चोरट्यांचा फड
चोरट्यांचा फड

(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
(आरं देवा रं, माझ्या राजा रं)

पायरीला गेले तडे, पाय झाले जड
आरं देवा, तुझ्या देवळात चोरट्यांचा फड
चोरट्यांचा फड

(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
(आरं देवा रं, माझ्या राजा रं)

(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
(आरं देवा रं, माझ्या राजा रं)
(आरं देवा रं, माझ्या राजा रं)



Credits
Writer(s): Mayuresh Kelkar, Vishnu Thore
Lyrics powered by www.musixmatch.com

Link