Tula Bolavu Kitida

सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?
सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?
वेळात वेळ, थोडा काढुनी वेळ
वेळात वेळ, थोडा काढुनी वेळ
दुनियेचा खेळ ये रे बघाया एकदा

सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?
सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?

राजकारणाचे तुला देऊ किती दाखले?
सहा महिन्याला माझे सरकार बदले
मशिदीला सांधु का, मंदिराला बांधू?
धर्माचा झाला आता साराच गोयंदा

सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?
सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?

मायापुंजी जमवून ठेवीलं गबाळ
त्याच माझ्या बँकेचं वाजलं दिवाड
असा आला काळ माझी उपाशीच बाळ
कोणाचे कष्ट आणि कोणाला मलिदा

सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?
सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?

नेत्याचे पाय इथे नेताच ओढी
शेजारी-पाजारी काढतोया खोडी
कुणी आशावादी, तो कुणी भाषावादी
आपल्याच भावाचा पाडतोया मुडदा

सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?
सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?

रोज आडमार्गाने येई सोने-चांदी
शहाणा ही लागलाय वेड्याच्या नादी
शिकलेला मर्द तरी ओढतोया गर्द
तमाशात बोले कुणी पुंडलिक वरदा

सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?
सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?
वेळात वेळ, थोडा काढुनी वेळ
वेळात वेळ, थोडा काढुनी वेळ
दुनियेचा खेळ ये रे बघाया एकदा

सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?
सत्यनारायणा तुला बोलावू कितीदा?



Credits
Writer(s): Vitthal Shinde, Harendra Hiraman Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link